
बीड, 14 जुलै (हिं.स.)। बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पाटोदा दौऱ्यात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत आयोजित शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाला उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप केले. तसेच PHN TechnoLab ला भेट देऊन आधुनिक शैक्षणिक सुविधांची पाहणी केली. यानंतर नगरपंचायत हद्दीतील उद्यान विकास कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच पाटोदा नगरपंचायतीतील एसआईआर कॅम्पला भेट देत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेत नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा देण्याबाबत मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis