एसआयआर कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यात गती; 82.12 टक्के मतदारांपर्यंत गणना प्रपत्र चे वितरण
चंद्रपूर, 14 जुलै, (हिं.स.)। विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला (एसआयआर) चंद्रपूर जिल्ह्यात गती आली असून 82.12 टक्के मतदारांपर्यंत गणना प्रपत्र चे वितरण करण्यात आले आहे. दरम्यान 47.50 टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भार
एसआयआर कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यात गती; 82.12 टक्के मतदारांपर्यंत गणना प्रपत्र चे वितरण


चंद्रपूर, 14 जुलै, (हिं.स.)। विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाला (एसआयआर) चंद्रपूर जिल्ह्यात गती आली असून 82.12 टक्के मतदारांपर्यंत गणना प्रपत्र चे वितरण करण्यात आले आहे. दरम्यान 47.50 टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) 2026 कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यात वेग आला असून, मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीरहित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. “एकही पात्र मतदार वंचित राहू नये आणि एकही अपात्र मतदार यादीत राहू नये” या ब्रीदवाक्याच्या आधारे जिल्हाभरातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करीत असून, प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मतदार यादीतील मृत, कायमस्वरूपी स्थलांतरित, दुबार अथवा इतर अपात्र नोंदींची छाननी करून त्या वगळणे तसेच नव्याने पात्र झालेल्या प्रत्येक नागरिकाचा समावेश करणे, हा या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या अनुषंगाने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत प्रत्येक मतदार कुटुंबाला गणना प्रपत्र (Enumeration Form) देण्यात येत असून, नागरिकांकडून आवश्यक माहिती व कागदपत्रे संकलित केली जात आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) यांचाही सक्रिय सहभाग आहे.

प्रगतीचा आढावा : दि. 13 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची प्रगती समाधानकारक झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 17 लाख 97 हजार 655 मतदार असून, त्यापैकी 14 लाख 76 हजार 191 मतदारांना म्हणजेच 82.12 टक्के मतदारांपर्यंत गणना प्रपत्र (Enumeration Form) चे वितरण करण्यात आले आहे.

यासोबतच गणना प्रपत्र (Enumeration Form) डिजिटायझेशन चे कामही वेगाने सुरू असून 8 लाख 53 हजार 923 अर्जांचे (47.50 टक्के) डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. तसेच 8 लाख 53 हजार 448 अर्जांची (47.48 टक्के) बीएलओ स्तरावरील पडताळणीही पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील सर्व 2 हजार 76 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे (बीएलओ) प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. याशिवाय 4 लाख 52 हजार 891 Self-Mapping आणि 3 लाख 96 हजार 431 Progeny Mapping ची नोंद करण्यात आली आहे.

मतदारसंघनिहाय प्रगती : गणना प्रपत्र (Enumeration Form) वितरणामध्ये राजुरा विधानसभा मतदारसंघाने 92.50 टक्के प्रगतीसह प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यानंतर ब्रह्मपुरी (88.50 टक्के), वरोरा (87.49 टक्के), चिमूर (85.19 टक्के), बल्लारपूर (79.66 टक्के) आणि चंद्रपूर (अ.जा.) मतदारसंघ (63.82 टक्के) असा क्रम आहे. उर्वरित मतदारांपर्यंतही लवकरात लवकर पोहोचून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न तीव्र केले आहेत.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) चा गौरव : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी करत 100 टक्के डिजिटायझेशन पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील 63 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा (बीएलओ) दि. 13 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, चंद्रपूर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या गौरवामुळे इतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनाही निर्धारित कालावधीत गुणवत्तापूर्ण व वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande