हरियाणा आणि आंध्र प्रदेशच्या एसआयआरच्या तारखांमध्ये बदल
नवी दिल्ली, 14 जुलै (हिं.स.)। निवडणूक आयोगाने हरियाणा आणि आंध्र प्रदेशशी संबंधित विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) संदर्भातील काही तारखांमध्ये बदल केला आहे. मात्र, दोन्ही राज्यांमध्ये मसुदा आणि अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्याच्या तारखांमध्ये कोणताही
Changes SIR Dates Haryana Andhra Pradesh


नवी दिल्ली, 14 जुलै (हिं.स.)। निवडणूक आयोगाने हरियाणा आणि आंध्र प्रदेशशी संबंधित विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) संदर्भातील काही तारखांमध्ये बदल केला आहे. मात्र, दोन्ही राज्यांमध्ये मसुदा आणि अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्याच्या तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

यासंदर्भात निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये त्यांच्या वतीने प्राप्त झालेल्या विनंतीची माहिती देत नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता बूथस्तरीय अधिकाऱ्यांच्या घराघरांत जाऊन पडताळणी करण्याची मुदत १५ जूनवरून वाढवून २४ जुलैपर्यंत करण्यात आली आहे. मतदार केंद्रांची पुनर्रचना २४ जुलैपर्यंत पूर्ण केली जाईल आणि ३१ जुलैपर्यंत मसुदा मतदार यादी प्रकाशित केली जाईल.याशिवाय, ३१ जुलै ते ३० ऑगस्ट या कालावधीत दावे आणि आक्षेप दाखल करता येतील. ३१ जुलै ते २८ सप्टेंबरदरम्यान दावे आणि आक्षेपांचे निवारण केले जाईल आणि अंतिम मतदार यादी ३ ऑक्टोबर रोजी प्रकाशित केली जाईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande