
मालेगाव, 14 जुलै (हिं.स.)मालेगाव शहरातील महेश नागरी पतसंस्थेत ठेवीदारांची फसवणूक झाली. पतसंस्थेतर्फे ठेवीदारांची रक्कम व्यवस्थापन देत नाही. सामाजिक कार्यकर्ते शेखर पगार व ठेवीदारांनी आंदोलने केली. त्यानंतर बँकेची मॅनेजरावर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यापासून मॅनेजर फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बँकेच्या मॅनेजरला राजस्थानहुन अटक केली आहे.
येथील महेश नागरी पतसंस्थेत सुमारे कोटीचा फसवणुकीचा प्रकार घडला. ठेवीदारांनी किल्ला पोलीस ठाण्यात तर उपनिबंधक कार्यालय येथे आंदोलन केली. ५ जून २०२६ रोजी बँकेचे मॅनेजर पवन नंदकिशोर पुरोहित यांच्या विरोधात किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल करणार असल्याची चाहूल लागताच बँकेच्या मॅनेजर हा फरार होता. तब्बल ४० दिवसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बँक मॅनेजरला राजस्थानहुन अटक केली आहे. यावेळी किल्ला पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक जाधव म्हणाले की, बॅक मॅनेजर यांच्या जबाब नोंदवला जाणार आहे. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस योग्य दिशेने तपास करीत आहे. राजस्थान हून स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्ता कांभीरे यांच्यासह पथकाने दमदार कारवाई केली आहे. त्यांच्या या कारवाईचे ठेवीदारांकडून व मालेगावातील नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV