वर्ध्यात स्थानिकांना रोजगार नाकारल्याच्या निषेधार्थ मनसेची कामगार कार्यालयावर धडक
वर्धा, 14 जुलै (हिं.स.) | भेसा व परसोडी येथील पवार ग्रीड कंपनीमध्ये स्थानिक युवकांना शासन नियमानुसार ८० टक्के रोजगार न देता बाहेरील कामगारांची भरती केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा कामगार कार्यालयावर धडक देत तीव्र संताप व्यक्
अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन


वर्धा, 14 जुलै (हिं.स.) | भेसा व परसोडी येथील पवार ग्रीड कंपनीमध्ये स्थानिक युवकांना शासन नियमानुसार ८० टक्के रोजगार न देता बाहेरील कामगारांची भरती केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा कामगार कार्यालयावर धडक देत तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी कामगार अधिकारी शिंदे कार्यालयात अनुपस्थित असल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या रिकाम्या खुर्चीवरच निवेदन ठेवून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध नोंदविला. निवेदन देताना मनसेने स्पष्ट इशारा दिला की, स्थानिक युवकांच्या रोजगारावर गदा आणणाऱ्या कंपन्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना यापुढे अजिबात पाठीशी घातले जाणार नाही.

शासनाच्या ८० टक्के स्थानिक रोजगाराच्या नियमाची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संबंधित प्रकल्पावर ''काम बंद'' आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी संबंधित कंपनी व प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष शंकर पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष नितीन अमृतकर तसेच इतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसेने प्रशासनाला सात दिवसांचा अंतिम अल्टिमेटम देत, स्थानिकांना रोजगार द्या, अन्यथा मनसेच्या आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा यावेळी देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande