नांदेडच्या पोलीस अंमलदार चंद्रकांत पुलकुंटवारांची जागतिक व्हॉलीबॉल स्पर्धेत यशस्वी पंच
नांदेड, 14 जुलै (हिं.स.)। अंमलदार चंद्रकांत पुलकुंटवार यांची जागतिक व्हॉलीबॉल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी कर्तव्यकठोर पोलीस प्रशासनात कार्यरत असताना क्रीडा क्षेत्रातही उत्तुंग भरारी घेता येते, हे नांदेडचे पोलीस अंमलदार चंद्रकांत पुलकुंटवार यांनी सिद्
Q


नांदेड, 14 जुलै (हिं.स.)। अंमलदार चंद्रकांत पुलकुंटवार यांची जागतिक व्हॉलीबॉल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी कर्तव्यकठोर पोलीस प्रशासनात कार्यरत असताना क्रीडा क्षेत्रातही उत्तुंग भरारी घेता येते, हे नांदेडचे पोलीस अंमलदार चंद्रकांत पुलकुंटवार यांनी सिद्ध करून दाखवले आहे. चीनमधील शियांगलू येथे आयोजित जागतिक शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा पार पडली. या जागतिक स्तरावरील महाकुंभात पंच म्हणून काम पाहण्याची सुवर्णसंधी पुलकुंटवार यांना मिळाली, जी त्यांनी आपल्या कौशल्याने सार्थ ठरवली आहे.

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाने महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनकडून दोन तज्ज्ञ पंचांची मागणी केली होती. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस स्टेशनचे अंमलदार चंद्रकांत पुलकुंटवार आणि नागपूरचे सौरभ रोकडे यांची निवड करण्यात आली. जागतिक पटलावर भारताचे प्रतिनिधित्व करत असताना पुलकुंटवार यांनी अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये दिलेले अचूक निर्णय आणि त्यांची शिस्त वाखाणण्याजोगी होती. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे सातासमुद्रापार महाराष्ट्र पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्पर्धेत यशस्वी कामगिरी बजावून मायदेशी परतल्यानंतर पुलकुंटवार यांचा यथोचित गौरव करण्यात आला.

नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी त्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या जिद्दीचे आणि कौशल्याचे कौतुक केले. अटकेपार महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा फडकावणाऱ्या या सुपुत्राचे सध्या सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande