परभणी - महेश गाडे प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
परभणी, 14 जुलै (हिं.स.)। सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या स्व. महेश गाडे प्रतिष्ठानच्या वतीने स्व. महेश गाडे यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर लहुजी नगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांसह युवकांनी उत्स्फूर
परभणी - महेश गाडे प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


परभणी, 14 जुलै (हिं.स.)। सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या स्व. महेश गाडे प्रतिष्ठानच्या वतीने स्व. महेश गाडे यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर लहुजी नगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांसह युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन नगरसेवक डॉ. केदार खटिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रमा शेजावळे, प्रल्हाद अवचार, सूरज चोपडे, अमोल अवकाळे, अजय वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. खटिंग यांनी महेश गाडे प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. अशा जीवनदायी उपक्रमांमुळे समाजात सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यातही प्रतिष्ठानने विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवा सुरू ठेवावी, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मुकेश गाडे, दीपक साळवे, भारत उबाळे, कार्तिक साळवे, प्रतीक बोराडे, अजय भांगे, कुलदीप साळवे, नागेश उबाळे, अक्षय मोरे, रवी उबाळे, प्रशांत सूर्यवंशी, भावेश मखवाना, गणेश गायकवाड, ओम उबाळे, आनंद कांबळे, अजिंक्य हिवाळे आणि विशाल गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराचे उपस्थित मान्यवर व नागरिकांनी कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande