पंकजा मुंडे बुधवारपासून चार दिवसांच्या बीड दौऱ्यावर
बीड, 14 जुलै (हिं.स.)। राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे या बुधवार (दि. १५)जुलै पासून चार दिवसांच्या बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या गेवराई, पाडळसिंगी, बीड, परळी, अंबाजोगाई, केज व मांजरसुंबा येथे व
पंकजा मुंडे


बीड, 14 जुलै (हिं.स.)। राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे या बुधवार (दि. १५)जुलै पासून चार दिवसांच्या बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या गेवराई, पाडळसिंगी, बीड, परळी, अंबाजोगाई, केज व मांजरसुंबा येथे विविध शासकीय, विकासात्मक व पक्षीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

बुधवार (दि. १५) रोजी सकाळी ११ वाजता त्या गेवराई येथे पोहोचून नगर परिषद सभागृहात शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर पाडळसिंगी येथे सुपरलक्ष्मी गोल्ड चक्की आटा उद्योगाच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात परळी तीर्थक्षेत्र विकासासह विविध शासकीय कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच सह्याद्री फॅमिली रेस्टॉरंटच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहून सायंकाळी बीड, गेवराई व आष्टी मतदारसंघातील कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटीगाठी घेतील. रात्री त्या परळी येथे मुक्कामी राहणार आहेत. गुरुवार (दि. १६) रोजी परळी व माजलगाव मतदारसंघातील नागरिक व पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. शुक्रवार (दि. १७) रोजी अंबाजोगाई येथे जस्ट नॅचरल सेंद्रीय कॉप शॉपच्या उद्घाटन कार्यक्रमास त्या उपस्थित राहतील. त्यानंतर केज मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन परळी येथे परतणार असून सायंकाळी परळी शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.शनिवार (दि. १८) रोजी सकाळी मांजरसुंबा येथे भाजपच्या तालुका संपर्क कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्या बीडमार्गे छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande