राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘जनसेवा सप्ताह’ नियोजनासाठी नाशिकमध्ये बैठक
नाशिक, १४ जुलै (हिं.स.) : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. ना. छगनरावजी भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ त
Public Service Week is not just


नाशिक, १४ जुलै (हिं.स.) : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. ना. छगनरावजी भुजबळ यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘जनसेवा सप्ताह’ अभियानाच्या नियोजनासाठी नाशिक येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

नाशिक येथील राष्ट्रवादी भवनात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष दिलीप आण्णा खैरे होते. यावेळी पक्षाचे विविध सेलचे जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत जनसेवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी, लोकहितकारी आणि जनकल्याणकारी उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक तालुका, शहर आणि विधानसभा क्षेत्रात हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले.

उपक्रमांची रूपरेषा, वेळापत्रक, जबाबदाऱ्यांचे वाटप तसेच सर्व स्तरांवर समन्वय राखून जनतेपर्यंत पक्षाची सेवा पोहोचविण्याबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्षांकडून मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम (SIR) तसेच पक्ष संघटनेच्या कामकाजाचा आढावाही घेण्यात आला.

यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप आण्णा खैरे म्हणाले, “जनसेवा सप्ताह हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून स्व. अजितदादा पवार यांच्या जनसामान्यांप्रती असलेल्या सेवाभावी विचारांना कृतीतून अभिवादन करण्याचा संकल्प आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून समाजोपयोगी उपक्रम प्रभावीपणे राबवावेत.”

जनसेवा सप्ताहातील प्रत्येक उपक्रमात नागरिकांचा व्यापक सहभाग मिळेल, अशा पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. विविध पदाधिकाऱ्यांनी बैठकीत आपले मनोगत व्यक्त करत सप्ताह यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच समाजाभिमुख कार्यातून राष्ट्रवादी काँग्रेसची जनतेशी असलेली बांधिलकी अधिक दृढ करण्यासाठी जिल्हाभर समन्वयाने काम करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

---------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande