
डोंबिवली, 14 जुलै (हिं.स.)।डोंबिवलीतील शास्त्रीनग रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण करणारे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर केला. त्यांच्या प्रकृतीचा विचार करून हा दिलासा देण्यात आल्याचे समोर आले आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi