राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नांदेडची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
नांदेड, 14 जुलै (हिं.स.)। नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ग्रामीण व शहर विभाग) वतीने एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आगामी जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा व शहरा
अ


नांदेड, 14 जुलै (हिं.स.)। नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (ग्रामीण व शहर विभाग) वतीने एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आगामी जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा व शहरात विविध सामाजिक व जनहितोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचे भव्य नियोजन आणि पूर्वतयारी करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.

सदर बैठक विधिमंडळ उपविधान समितीचे प्रमुख माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली.

या बैठकीस माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार अविनाशराव घाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, शहर कार्याध्यक्ष माधव पावडे, लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष शरद पवार, उपनगराध्यक्ष करीम शेख, देगलूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रतिनिधी बालाजी टेकाळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, कंधार नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, शहर कार्याध्यक्ष सुरजितसिंघ गिल, ग्रामीण कार्याध्यक्ष अशोक पाटील मुगावकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कन्हैया कदम, नांदेड जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील शिंदे, उत्तर जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील इंगळे, शहर जिल्हाध्यक्ष मोहसीन खान पठाण यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande