राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची प्रक्रिया घटनेनुसार, कायद्यानुसार व नियमानुसारच - तटकरे
मुंबई, 14 जुलै, (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची प्रक्रिया घटनेनुसार... कायद्यानुसार व नियमानुसारच आहे असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान यासंद
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची प्रक्रिया घटनेनुसार, कायद्यानुसार व नियमानुसारच - तटकरे


मुंबई, 14 जुलै, (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची प्रक्रिया घटनेनुसार... कायद्यानुसार व नियमानुसारच आहे असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. दरम्यान यासंदर्भात कोअर कमिटीच्या बैठकीत संबंधितांवर पक्षशिस्तभंग किंवा अन्य कारवाईचा विचार केला जाईल असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

सच्चिदानंद सिंह यांनी जी नोटीस वजा पत्र पाठवले आहे. त्यात सकृतदर्शनी बिलकुल तथ्य नाही असे सांगतानाच वहिनींची अध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक लावण्यात आली आणि ती नियमानुसारच होती... कामकाजही नियमानुसार झाले आणि झालेली निवडही वैध पध्दतीने झालेली आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

त्यांनी जी काही नोटीस दिली आहे त्यासंदर्भात लवकरच कोअर कमिटीची बैठक होईल आणि वकीलांचा व तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील कारवाई करु असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

माझा त्या व्यक्तीशी संवाद झालेला नाही. आणि दिल्ली पातळीवर काही झाले असेल तर मला ज्ञात नाही. त्यामुळे आम्ही आज किंवा उद्या यासंदर्भातील कोअर कमिटीची बैठक घेऊन कायदेशीर वैधता तपासू मात्र या नोटीसमध्ये कोणतेही तथ्य नाही असे वैयक्तिक मतही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले.

कुणी एखादी व्यक्ती पत्र लिहिते याचा अर्थ पक्षात असंतोष आहे हे मानणेच चुकीचे आहे. कुण्या एका व्यक्तीचे मत म्हणजे पक्ष नाही. पक्ष पक्षाच्या भूमिकेतून वाटचाल करत असतो. विशेष करून वहिनींच्या नेतृत्वाखाली एकसंघपणाने पक्ष वाटचाल करत आहे. पक्ष लोकशाही मार्गाने चालत आहे असेही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande