मतदार पुनरिक्षणाच्या कामात हलगर्जी; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)। सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील विशेष मतदार पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एका शिक्षकाविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नावअनंत अरुण
Jan gangna


सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)। सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील विशेष मतदार पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी एका शिक्षकाविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नावअनंत अरुणराव पाटीलअसून ते विडी घरकूल येथीलराष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळेतकार्यरत आहेत.

महापालिकेचे आरोग्य निरीक्षकमुकेश पांडुरंग बद्दुरकर (वय 33)यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना असूनही अनंत पाटील यांनी त्यांना सोपविण्यात आलेले काम वेळेत पूर्ण केले नाही. त्यांच्याशी वारंवार दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांचा मोबाईल बंद होता. पर्यवेक्षकांनी शाळेत मुख्याध्यापकांकडे तसेच त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली, तरीही ते उपलब्ध झाले नाहीत.प्रकरणी त्यांच्याकडे खुलासा मागविण्यात आला होता. मात्र, त्यांनी त्यालाही उत्तर दिले नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाच्या प्राधान्यक्रमावरील राष्ट्रीय महत्त्वाच्या कामात निष्काळजीपणा, हलगर्जीपणा आणि दिरंगाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारीअमोलसिंह भोसलेयांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार कारवाई करण्यात आली असून,लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 134अंतर्गत अनंत पाटील यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande