जपान ओपन : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सलामी
टोकियो, 14 जुलै, (हिं.स.) - दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करत दमदार सुरुवात केली. जागतिक क्रमवारीत १० व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने मंगळवारी पहिल्या फेरीत
पीव्ही सिंधू


टोकियो, 14 जुलै, (हिं.स.) - दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश करत दमदार सुरुवात केली. जागतिक क्रमवारीत १० व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने मंगळवारी पहिल्या फेरीत मलेशियाच्या वोंग लिंग चिंगचा २१-१४, २१-११ असा सहज पराभव केला.

सिंधू सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळली. तिने लांब रॅलींमध्ये नियंत्रण राखले, सुरुवातीलाच आघाडी घेतली आणि पहिल्या गेमच्या मध्यांतरापर्यंत ११-६ अशी आघाडी घेतली. त्यानंतर तिच्या अचूक ड्रॉप शॉट्स, बॅकहँड्स आणि हाफ-स्मॅशने मलेशियाच्या बॅडमिंटनपटूला सतत दबावाखाली ठेवले. पहिला गेम २१-१४ ने जिंकला. आणि तिने दुसऱ्या गेममध्येही आपल्या प्रतिस्पर्धीला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. सिंधूने ८-२ अशी आघाडी घेतली आणि मध्यांतरापर्यंत ती ११-३ अशी केली. त्यानंतर तिने एकापाठोपाठ एक गुण मिळवत तो गेम आणि सामना २१-११ असा जिंकला.

भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनीही मिश्र दुहेरीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. या भारतीय जोडीने स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ज्युली मॅकफर्सन यांचा २१-१६, २१-१४ असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

मात्र, मिश्र दुहेरीमध्ये भारताला निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागले. पहिल्या फेरीत रोहन कपूर आणि रुत्विका शिवानी गड्डे यांची जोडी अव्वल मानांकित चिनी जोडी फेंग यान झे आणि हुआंग डोंग पिंग यांच्यासमोर टिकाव धरू शकली नाही. चिनी जोडीने हा सामना २१-११, २१-१० असा जिंकून भारतीय बॅडमिंटनपटूंचा प्रवास संपवला. आता, भारतीय बॅडमिंटन चाहत्यांचे लक्ष दुसऱ्या फेरीत पीव्ही सिंधू आणि ध्रुव-तनिषा यांच्यावर असेल. जर सिंधूने आपला सध्याचा फॉर्म कायम ठेवला, तर ती जपान ओपनच्या विजेतेपदासाठी एक प्रबळ दावेदार ठरू शकते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande