आषाढी यात्रेसाठी महावितरण सज्ज; वाखरी-पंढरपूर मार्गावर १७ रोहित्रांची जोडणी
सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)। आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या दिंड्या, पालख्या आणि लाखो भाविकांना अखंड व सुरक्षित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने व्यापक तयारी पूर्ण केली आहे. वाखरी पालखी तळ ते पंढरपूर या पालखी मार्गावर १७ वितरण रोहित्रांची जोडणी करण्यात आ
mahavitran


सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)। आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या दिंड्या, पालख्या आणि लाखो भाविकांना अखंड व सुरक्षित वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने व्यापक तयारी पूर्ण केली आहे. वाखरी पालखी तळ ते पंढरपूर या पालखी मार्गावर १७ वितरण रोहित्रांची जोडणी करण्यात आली असून संपूर्ण मार्ग लख्ख प्रकाशात नाहून निघणार आहे. यासाठी ५०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले असून २४ तास कार्यरत इमर्जन्सी सेंटरही सुरू करण्यात आले आहे.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर ३३ केव्हीच्या ९ वीजवाहिन्या, १२ उपकेंद्रे आणि ३८ अकरा केव्ही वीजवाहिन्यांची देखभाल व दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. तसेच १३७ ठिकाणी झुकलेले वीजखांब बदलण्यात आले आहेत.पावसाची शक्यता आणि भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन विजेच्या अपघातांचा धोका टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. त्यानुसार ५८२ उच्चदाब वीजखांब आणि स्टे-वायरवर प्लास्टिकचे संरक्षक आवरण बसविण्यात आले आहे.याशिवाय, सर्व १२ उपकेंद्रांतील पावर ट्रान्सफॉर्मर आणि ४९० वितरण रोहित्रांचे ऑइल टॉप-अप करण्यात आले आहे. ९३ ठिकाणी गार्डिंग, ७३५ ठिकाणी स्पेसर्स बसविणे, ८७ रोहित्रांना संरक्षक फेन्सिंग करणे तसेच १२९ वितरण रोहित्रांच्या डिस्ट्रिब्युशन बॉक्सची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच ४६७ फीडर पिलर आणि मिनी पिलरवर प्लास्टिक शीट बसवून विजेच्या अपघाताचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.महावितरणच्या या नियोजनामुळे आषाढी यात्रेदरम्यान वाखरी ते पंढरपूर पालखी मार्गावर भाविकांना सुरक्षित आणि अखंड वीजसेवा उपलब्ध होणार आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande