
रायगड, 15 जुलै (हिं.स.)। अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली पाटील करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मे २०२५ ते १५ जून २०२६ या कालावधीत रोहा पोलीस ठाणे हद्दीत हा प्रकार घडला. आरोपी क्रमांक १ व २ यांनी पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपी क्रमांक ३ व ४ यांच्या मुलगा असलेल्या आरोपी क्रमांक ५ याच्यासोबत १० मे २०२५ रोजी तिचा विवाह लावून दिला.
त्यानंतर आरोपी क्रमांक ५ याने संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे पीडित मुलगी गर्भवती झाली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २११/२०२६ नोंदविण्यात आला असून, आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ६४, ६४(२)(आय), ६४(२)(एम), ३(५), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम.2012 चे कलम
4,6,8,12, 17,21 सह बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2007 चे कलम 9,11 प्रमाणे गुन्हा दाखल
करण्यात आला असून अधिक तपास म.स.पोनि / रूपाली पाटील ह्या करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)