के के वाघच्या तन्वीरची श्रीलंका येथील स्पर्धेसाठी निवड
नाशिक, 15 जुलै (हिं.स.)। : के के वाघ सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सरस्वतीनगर, नाशिक येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थी व जिल्ह्यातील उत्कृष्ट विकेटकीपर तन्वीर सय्यद याची श्रीलंका येथे आयोजित आंतरराष्ट्रीय ५० बॉल्स क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघा
के के वाघच्या तन्वीरची श्रीलंका येथील स्पर्धेसाठी निवड


नाशिक, 15 जुलै (हिं.स.)।

: के के वाघ सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सरस्वतीनगर, नाशिक येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थी व जिल्ह्यातील उत्कृष्ट विकेटकीपर तन्वीर सय्यद याची श्रीलंका येथे आयोजित आंतरराष्ट्रीय ५० बॉल्स क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या प्रॅक्टिस कॅम्पमध्ये निवड झालेली आहे.

या प्रॅक्टिस कॅम्पसाठी देशभरातून निवड झालेल्या २० खेळाडूंमधून अंतिम १५ खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. तन्वीरने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ही संधी मिळवली असून, त्याच्या या यशामुळे शाळा, पालक, शिक्षक आणि नाशिक जिल्ह्याचा गौरव झाला आहे.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. समीर बाळासाहेब वाघ, संस्थेचे सचिव प्रा. के. एस. बंदी, समन्वयक डॉ. भूषण कर्डिले, प्राचार्य चित्रा नरवडे यांनी तन्वीरला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande