खोपोलीतील ज्योती स्टीलमधील चोरी उघड; पाच आरोपी जाळ्यात
रायगड, 15 जुलै (हिं.स.)। खालापूर तालुक्यातील होनाड परिसरातील ज्योती स्टील इंडस्ट्रीजमधून सुमारे ६३ हजार रुपये किमतीचे लोखंडी बिलेट चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना खोपोली पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली आहे. या घटनेमुळे औद्योगिक परिसरात ख
Theft at Jyoti Steel solved; five accused netted by police.


रायगड, 15 जुलै (हिं.स.)। खालापूर तालुक्यातील होनाड परिसरातील ज्योती स्टील इंडस्ट्रीजमधून सुमारे ६३ हजार रुपये किमतीचे लोखंडी बिलेट चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना खोपोली पोलिसांनी रंगेहात पकडून अटक केली आहे. या घटनेमुळे औद्योगिक परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक १ ते ५ यांनी आपापसात संगनमत करून ते काम करत असलेल्या ज्योती स्टील इंडस्ट्रीजमधून फिर्यादीच्या परवानगीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ६३ हजार रुपये किमतीचे लोखंडी बिलेट चोरून नेण्याचा प्रयत्न केला. चोरीचा माल बाहेर नेत असताना पोलिसांनी कारवाई करून सर्व आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले.

या प्रकरणी सर्व पाच आरोपींना पहाटे २.२८ वाजता अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीचा माल जप्त करण्यात आला असून या प्रकरणातील इतर बाबींचा तपास सुरू आहे.

याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५०/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३०६ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande