नाशिक - जिल्हा बँकेच्या २३,२२४ कर्जदार सभासदांना योजनेचा लाभ मिळणार - संतोष बिडवई
नाशिक, 02 जुलै (हिं.स.)। राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, आत्मविश्वास वाढविण्यासाठी तसेच शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने ''पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योज
नाशिक - जिल्हा बँकेच्या २३,२२४ कर्जदार सभासदांना योजनेचा लाभ मिळणार - संतोष बिडवई


नाशिक, 02 जुलै (हिं.स.)। राज्य शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, आत्मविश्वास वाढविण्यासाठी तसेच शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' जाहीर केली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तातडीने कार्यवाही करत जिल्ह्यातील २३ हजार ७९८ कर्जखात्यांचा (२३ हजार २२४ कर्जदार सभासदांचा) तपशील शासनाच्या पोर्टलवर अपलोड केला असल्याची माहिती बँकेचे प्रशासक संतोष बिडवई यांनी दिली.

राज्य शासनाने सर्व पात्र कर्जदारांचा तपशील वेळेत पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना दिल्यानंतर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विशेष मोहीम राबवून सर्व शाखांकडून माहिती संकलित केली. त्यानंतर कर्जदार सभासदांच्या कर्जखात्यांची पडताळणी करून संपूर्ण माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ वेळेत मिळण्यास मदत होणार आहे. बिडवई यांनी सांगितले की, शासनाच्या निर्देशानुसार योजनेची पारदर्शक, प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी बँकेने आवश्यक सर्व कार्यवाही पूर्ण केली आहे. पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यात आले असून, योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी बँक प्रशासन कटिबद्ध आहे. योजनेअंतर्गत पुढील प्रक्रियेनुसार शासनाकडून पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याचेही बिडवई यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित कर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे व माहिती अद्ययावत ठेवावी आणि बँकेच्या शाखांशी संपर्कात राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

चौकट

तालुकानिहाय कर्जखात्यांचा तपशील असा...

नाशिक – ८७९

सिन्नर – २,१४९

निफाड – २,९३८

दिंडोरी – १,११९

सुरगाणा – २८१

पेठ – ८३८

इगतपुरी – ७६३

मालेगाव – ३,२४६

सटाणा – १,७३४

कळवण – ६३२

चांदवड – २,०१४

नांदगाव – २,६६५

देवळा – १,१५०

त्र्यंबकेश्वर – ४६१

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande