
अमरावती, 02 जुलै (हिं.स.)। जिल्ह्यात १ जूलैपासून शाळा सुरू झाल्या आहेत. तरीही आरटीई प्रवेशाच्या तब्बल ६४६ जागा रिक्त आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात १९८२ जागांवर प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता रिक्त जागांसाठी पुन्हा प्रतिक्षा यादीतील तिसरी फेरी राबविली जात असून याकरिता ३ जूलैची डेडलाईन देण्यात आली आहे.
सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. यंदा या प्रक्रियेला पालकांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील २२७शाळांमध्ये २ हजार ६२६ जागाराखीव होत्या. या जागांसाठी तब्बल ७ हजार ९५३ पालकांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. १० एप्रिल रोजी पहिली मुख्य सोडत (लॉटरी) जाहीर झाली. यात २ हजार ५८६ विद्यार्थ्यांची निवड झाली. मात्र त्यापैकी केवळ १ हजार ९८२ विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश निश्चित्त केला. २५ जून रोजी दुसरी फेरी संपली. तर तिसऱ्या फेरीला ३ जुलैची डेडलाईन देण्यात आली आहे. अद्यापही जिल्ह्यात ६४६ जागा रिक्त असल्याने या जागांवर प्रवेशाकरिता आता चौथी फेरी घ्यावी लागणार आहे.
या अडचणींमध्ये प्रवेश रखडले
अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून खूप लांब असलेल्या किवा अनपेक्षित शाळांमध्ये प्रवेश मिळाल्यात. पालकांना पाल्यासाठी ज्या नामांकित शाळां हव्या होत्या, त्या न मिळाल्याने त्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली. तसेच गैरसोयीच्या ठिकाणी असलेल्या शाळांमध्ये प्रवेश मिळाल्याने पालकांनीपप्रवेशच केले नाही तरबांच पालकांनी कागदपत्रांची पुर्तता केली नाही. त्यामुळे अद्यापही ६४६ जागा प्रवेशाकरिता रिक्त आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी