
परभणी, 02 जुलै (हिं.स.)।
शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या/शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुलां/मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षातील विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जामध्ये असलेल्या त्रुटी पूर्ण करण्याबाबत यापूर्वी कार्यालयाने वारंवार कळविले आहे. परंतु काही विद्यार्थ्यांनी अद्यापही त्रुटींची पूर्तता केलेली नाही. सदर विद्यार्थ्यांनी दि. ७ जुलै, २०२६ पर्यंत ऑनलाइन त्रुटींची पूर्तता करून त्याची प्रिंट ऑफलाइन पद्धतीने कार्यालयात सादर करण्याकरिता अंतिम मुदत देण्यात येत आहे.दि. ७ जुलै, २०२६ पर्यंत ज्यांनी त्रुटींची पूर्तता केली नाही, अशा विद्यार्थ्यांचे अर्ज कायमस्वरूपी अपात्र ठरविण्यात येणार आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी विहित वेळेत त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त आर.एच. एडके यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis