बीएलओंनी एसआयआरचे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे - सोलापूर जिल्हाधिकारी
सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील दिनांक 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत 39 लाख 38 हजार 63
Collctor


सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)।

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील दिनांक 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत 39 लाख 38 हजार 631 मतदारांसाठी 3 हजर 723 बीएलओ मार्फत हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. तरी सर्व बीएलओनी हे काम एक राष्ट्रीय कर्तव्य समजून अत्यंत काटेकोरपणे दिलेली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विषय सकल कार्यक्रम कामकाजाची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांनी घेऊन सर्व संबंधित विभाग प्रमुख मतदार नोंदणी अधिकारी बी एल ओ यांना मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी महसूल लक्ष्मण कसेकर, उपजिल्हाधिकारी अभय भोसले, प्रांताधिकारी सदाशिव पडदूने, सुमित शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी सुशांत बनसोडे, निवडणूक तहसीलदार श्री. विभुते, महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा समन्वयक प्रसाद मिरकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख, माध्यमिक सचिन जगताप, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सीडीपीओ हे ऑनलाइन द्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन म्हणाले की, 30 जून पासून आपल्या जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास सुरुवात झालेली आहे. परंतु 3 हजार 723 पैकी 46 बीएलओ नी प्रशिक्षण घेतलेले नाही. तसेच काही बीएलओ नी इआरओ यांच्याकडून साहित्य घेऊन गेलेले नाहीत. तरी सर्व संबंधित बीएलओ त्वरित प्रशिक्षण पूर्ण करून घ्यावे व साहित्यही घेऊन जावे. तसेच आपल्या भागात जाऊन दररोज किमान 100 ते 150 एपिक फॉर्म मतदारांना वितरित करावेत, असे सूचना देऊन जे बीएलओ हे काम करणार नाहीत किंवा बी एल ओ नी हे काम करताना त्यांचे वरिष्ठ अडचण निर्माण करत असतील तर अशा संबंधात त्यावर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी निर्देशित केले.

सोलापूर जिल्हा हा राज्यात सर्वात जास्त मतदारसंख्या असलेल्या जिल्ह्यात पाचवा जिल्हा आहे. एकूण 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये 39 लाख 38 हजार 631 मतदार आहेत. त्यामुळे सर्व संबंधित बी एल ओ यांनी या कार्यक्रमांतर्गत त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी एक राष्ट्रीय कर्तव्य समजून पार पाडावी. या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. तसेच शिक्षण विभागानेही बी एल ओ म्हणून नियुक्त केलेल्या अडीच हजार पेक्षा अधिक शिक्षकांना विशेष सखोल पुरीक्षण कार्यक्रमातिरिक्त कोणत्याही प्रकारची जबाबदारी देऊ नये. पुढील एक महिना याच कामाला अधिक प्राधान्य दिले गेले पाहिजे. तसेच आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभागाने त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना (आशा वर्कर, अंगणवाडी सेविका) यांनाही इतर अधिकचे जबाबदारी देऊ नयेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिले.

प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी अकरा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी यांनी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत कशा पद्धतीने काम केले पाहिजे याची सविस्तरपणे माहिती दिली. तसेच रोजच्या रोज बीएलओ यांच्याकडून या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात यावा. मतदार नोंदणी अधिकारी यांना अतिरिक्त सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी यांची मागणी असेल तर त्याबाबतचे प्रस्ताव त्वरित पाठवण्याचे सूचनाही त्यांनी दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande