नेकरूर येथे प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय व चौसाळा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय
बीड, 02 जुलै (हिं.स.)। नेकरूर येथे प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय व चौसाळा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय मंजूर होणेबाबत संदर्भात आज सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेण्यात आली. या निवेदनामध्ये परिसरातील नागरि
अ


बीड, 02 जुलै (हिं.स.)।

नेकरूर येथे प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय व चौसाळा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय मंजूर होणेबाबत संदर्भात आज सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेण्यात आली.

या निवेदनामध्ये परिसरातील नागरिकांच्या प्रशासनिक सोयी, भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या, वाहतूक सुविधा तसेच भविष्यातील विकासाचा विचार करून अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थानाबाबत फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकहिताला प्राधान्य देत नागरिकांच्या भावना व ग्रामसभांच्या ठरावांचा शासनाने गांभीर्याने विचार करून सर्वांसाठी न्याय्य आणि सोयीस्कर असा निर्णय घ्यावा.

यावेळी अशोक लोढा यांच्यासह नेकनूर व चौसाळा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande