बीडमध्ये किरकोळ वादातून गोळीबाराची घटना; पोलिस तपास सुरू
बीड, 02 जुलै (हिं.स.) : शहरातील जालना रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये दोन तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर गोळीबारात झाल्याची धक्कादायक घटना चव्हाटा फाटा परिसरात घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये
प्रतिकात्मक


बीड, 02 जुलै (हिं.स.) : शहरातील जालना रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये दोन तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर गोळीबारात झाल्याची धक्कादायक घटना चव्हाटा फाटा परिसरात घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये वेगवेगळ्या टेबलवर जेवण करत असताना दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर काही वेळाने दोघेही चव्हाटा फाटा परिसरात आले असता, तेथे पुन्हा वाद उफाळून आला आणि गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर दोन्ही तरुणांनी एकमेकांवर आरोप करत तक्रारी नोंदवल्या आहेत. सुरुवातीला एक तरुण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेला होता, मात्र घटनास्थळ शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने हे प्रकरण पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला असून, नेमकी वस्तुस्थिती तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande