रत्नागिरी : रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण संघातर्फे पारितोषिकांसाठी आवाहन
रत्नागिरी, 2 जुलै (हिं.स.) । रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कर्हाडे ब्राह्मण ज्ञातीमधील गुणवंत विद्यार्थ्यांकरिता रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे पारितोषिके दिली जाणार आहेत. त्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कऱ्हा
रत्नागिरी : रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण संघातर्फे पारितोषिकांसाठी आवाहन


रत्नागिरी, 2 जुलै (हिं.स.) । रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कर्हाडे ब्राह्मण ज्ञातीमधील गुणवंत विद्यार्थ्यांकरिता रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे पारितोषिके दिली जाणार आहेत. त्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कऱ्हाडे ब्राह्मण ज्ञातीतील ज्या विद्यार्थ्यांना विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश मिळाले आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी गुणवत्ता पारितोषिके दिली जातात. यावर्षीदेखील ज्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त व बारावीमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत तसेच पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे, अशा विद्यार्थ्यांनी संघाकडे विहित नमुन्यात अर्ज करावेत.

कर्हाडे ब्राह्मण ज्ञातीतील आठवीपासून पुढील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. यासाठी गरजू विद्यार्थ्यांनी कर्हाडे ब्राह्मण संघात उपलब्ध असणाऱ्या विहित नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे. यासाठी रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण संघ, शेरे नाका- झाडगाव, रत्नागिरी (९४०३३०३१४५) येथे संपर्क साधून ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज द्यावेत, असे आवाहन संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande