नांदेड - गैरव्यवहारांची चौकशी करण्याची सभापती गजानन मुंडे यांची मागणी
नांदेड, 02 जुलै (हिं.स.)। कृषी उत्पन्न बाजार समिती, किनवट येथे १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत झालेल्या कथित आर्थिक, प्रशासकीय व कायदेशीर अनियमिततांची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून विशेष लेखापरीक्षण (स्पेशल ऑडिट) करावे, तसेच दोषींवर दिव
नांदेड - गैरव्यवहारांची चौकशी करण्याची सभापती गजानन मुंडे यांची मागणी


नांदेड, 02 जुलै (हिं.स.)। कृषी उत्पन्न बाजार समिती, किनवट येथे १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत झालेल्या कथित आर्थिक, प्रशासकीय व कायदेशीर अनियमिततांची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून विशेष लेखापरीक्षण (स्पेशल ऑडिट) करावे, तसेच दोषींवर दिवाणी, फौजदारी व विभागीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यमान सभापती गजानन मुंडे यांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, किनवट यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे. तक्रारीनुसार तत्कालीन सभापती, सचिव, संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी

संगनमताने सार्वजनिक निधीचा अपहार, नियमबाह्य कर्मचारी भरती, बनावट बिले, बाजार शुल्कातील अफरातफर आणि जमीन विक्रीतील मंजुरीच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांकडून वसूल करण्यात आलेली बाजार फी समितीच्या अधिकृत खात्यात जमा न करता तिचा वैयक्तिक वापर करण्यात आल्याचा तसेच खोटी बिले तयार करून लाखो रुपयांचा निधी अपहार झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. याशिवाय विभागीय रोस्टर, आरक्षण नियम व सक्षम प्राधिकाऱ्याची मंजुरी न घेता कर्मचारी भरती झाल्याचा आरोप करण्यात आला. सचिवांना नियमबाह्य मुदतवाढ देणे, अनामत रकमेची उचल तसेच वेतन व इतर आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande