मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वयंपाकीय रजाक शेख यांची विधान भवन पाहण्याची इच्छा केली पूर्ण
लातूर, 02 जुलै (हिं.स.)। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वयंपाकीय रजाक शेख यांची विधान भवन पाहण्याची इच्छा केली पूर्ण.. समाज माध्यमावर केली पोस्ट गेली तब्बल ३५ वर्षे आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून स्वयंपाकी म्हणून सेवा देणारे रज्जाक मामू
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील


लातूर, 02 जुलै (हिं.स.)। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वयंपाकीय रजाक शेख यांची विधान भवन पाहण्याची इच्छा केली पूर्ण.. समाज माध्यमावर केली पोस्ट

गेली तब्बल ३५ वर्षे आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून स्वयंपाकी म्हणून सेवा देणारे रज्जाक मामू शेख यांची आज एक छोटीशी पण आयुष्यभर लक्षात राहणारी इच्छा पूर्ण करण्याचा योग आला.

महाराष्ट्राच्या लोकशाहीचे केंद्र असलेल्या विधान भवनात घेऊन आलो. विधान भवन पाहण्याची रज्जाक मामूंची अनेक वर्षांची इच्छा आज पूर्ण झाली. विधान भवनात प्रवेश करताना मामूंच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, समाधान आणि कृतज्ञतेची भावना पाहून मन खरोखर भरून आले. हा केवळ फक्त त्यांचा आनंद नव्हता, तर प्रत्येक कष्टकरी, प्रामाणिक आणि निःस्वार्थपणे काम करणाऱ्या माणसाच्या सन्मानाचा क्षण होता.

रज्जाक मामू गेली अनेक वर्षे प्रेमाने आणि आत्मीयतेने आमच्यासाठी स्वयंपाक करत आहेत. रज्जाक मामूंच्या हातच्या जेवणामुळे आम्हाला दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. खरं तर, रज्जाक मामू प्रेमाने बनवलेले प्रत्येक अन्न नसून, तो आपुलकी, जिव्हाळा आणि सेवाभावाची अनुभूती असते. त्यामुळेच आज मी तंदुरुस्त राहू शकतो, यामध्ये रज्जाक मामूंचा मोठा वाटा आहे.

समाजात प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची असते. कोणतेही काम लहान नसते आणि प्रत्येक माणसाच्या स्वप्नाला, भावनांना आणि आनंदाला तितकेच महत्त्व असते. रज्जाक मामूंची इच्छा पूर्ण करून त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य पाहणे, हे माझ्यासाठीही अत्यंत समाधानाचा क्षण होता.

प्रत्येकाचा आनंद महत्त्वाचा... कारण माणुसकीची खरी ओळख ही पदात नाही, तर रज्जाक मामूंसारख्या माणसांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यात असते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande