उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार सईद खान यांना मार्गदर्शनाची शिदोरी; विकासकामांवर सविस्तर चर्चा
परभणी, २ जुलै (हिं.स.) : मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार सईद खान यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मतदारसंघातील विविध विकासकामे, स्थानिक प्रश्न तसेच आगामी नियोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी परभणी–हिंगोली वि
अ


परभणी, २ जुलै (हिं.स.) : मुंबई येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार सईद खान यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मतदारसंघातील विविध विकासकामे, स्थानिक प्रश्न तसेच आगामी नियोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली.

यावेळी परभणी–हिंगोली विधान परिषद निवडणुकीत मोलाचे मार्गदर्शन करणारे रामप्रसाद बोर्डीकर उपस्थित होते. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार सईद खान यांनी केलेल्या जनहिताच्या कामांचे कौतुक करत, आपण योग्य उमेदवाराला संधी दिली, अशा भावना व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांनी विकासकामांच्या अंमलबजावणीबाबत मोलाचे मार्गदर्शनही केले.भेटीनंतर आमदार सईद खान म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरत जनतेची सेवा करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande