
छत्रपती संभाजीनगर, 02 जुलै (हिं.स.)। 'ठाकरेंना सोडून जाणाऱ्यांवर कठोर टीका करत छत्रपती संभाजी नगर येथील निवडणुकीत आमदार अंबादास दानवे यांचा स्वार्थ दिसून आला' अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांची साथ सोडून आमदार,खासदार आणि नेते जात असल्याने जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी नाराजी व्यक्त केली तसेच ठाकरेंचे आमदार अंबादास दानवे जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीसोबत असल्याने हे प्रकरण उद्धव ठाकरे पर्यंत गेले असून
अंबादास दानवे यांचा स्वार्थ दिसून आल्याचे वक्तव्य केले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी संवाद साधला त्यावेळी बोलताना त्यांनी कठोर शब्दात टीका केली
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis