थायलंडमध्ये ११ वर्षांच्या मुलाने पिकअप ट्रक यात्रेकरूंच्या अंगावर घातला; आठ बौद्ध भिक्षूंचा मृत्यू
बँकॉक, 02 जुलै (हिं.स.)।ईशान्य थायलंडमध्ये गुरुवारी ११ वर्षीय मुलाने यात्रेसाठी निघालेल्या बौद्ध भिक्षूंच्या समूहावर पिकअप ट्रक घातल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेत किमान आठ भिक्षूंचा मृत्यू झाला. वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, मुकदाहान प
थायलंडमध्ये ११ वर्षांच्या मुलाने पिकअप ट्रक यात्रेकरूंच्या अंगावर घातली; आठ बौद्ध भिक्षूंचा मृत्यू


बँकॉक, 02 जुलै (हिं.स.)।ईशान्य थायलंडमध्ये गुरुवारी ११ वर्षीय मुलाने यात्रेसाठी निघालेल्या बौद्ध भिक्षूंच्या समूहावर पिकअप ट्रक घातल्याने भीषण अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेत किमान आठ भिक्षूंचा मृत्यू झाला.

वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, मुकदाहान प्रांताचे राज्यपाल वोरायान बुन्नारात यांनी सांगितले की, पाच भिक्षूंचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याशिवाय, जखमी झालेल्या आणखी १४ भिक्षूंना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.दरम्यान, या अपघातातून बचावलेल्या भिक्षूंनी पोलिसांना सांगितले की, पिकअप ट्रकचा चालक वाहनावरील नियंत्रण गमावल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर वाहन रस्त्यावरून घसरत थेट त्यांच्या समूहावर आदळले.राजधानी बँकॉकपासून सुमारे ६०० किलोमीटर ईशान्येला असलेल्या मुकदाहान प्रांतातील एकूण ३५ बौद्ध भिक्षू यात्रेसाठी पायी निघाले असताना हा दुर्दैवी अपघात घडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande