बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी जयश्री चव्हाण
बीड, 02 जुलै (हिं.स.)। राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ मधील शिक्षणाधिकारी पदांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी जयश्री चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. त्या
बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी जयश्री चव्हाण


बीड, 02 जुलै (हिं.स.)। राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ मधील शिक्षणाधिकारी पदांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी जयश्री चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. त्या सध्या छत्रपती संभाजीनगर प्राथमिक वि भागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

बीड जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावरून गेल्या काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी या पदावर मयुरेश मोरे यांची नियुक्ती झाली होती, मात्र काही दिवस पदभार सांभाळल्यानंतर ते दीर्घ रजेवर गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीत बीडचे गटशिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे यांच्याकडे या पदाचा प्रभारी कार्यभार सोपवण्यात आला होता. दरम्यान, सोनवणे शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. सोनवणे यांच्या सेवानिवृत्तीनंतर मयुरेश मोरे पुन्हा पदावर रुजू होतील, अशी शक्यता वर्तवली जात असतानाच शासनाने मोठा निर्णय घेतला. शालेय शिक्षण विभागाने आपल्या नियतकालिक बदल्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांची थेट बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी बदली केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande