अवघ्या १० तासांत अपहरण झालेल्या १२ वर्षीय मुलीचा शोध; आरोपी अटकेत
लातूर, २ जुलै (हिं.स.) : उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने अपहरण झालेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अवघ्या १० तासांत शोध घेत तिला सुखरूप तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर
पोलीस कारवाई


लातूर, २ जुलै (हिं.स.) : उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने अपहरण झालेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अवघ्या १० तासांत शोध घेत तिला सुखरूप तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या १२ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना ३० जून २०२६ रोजी रात्री घडली. मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर महिलेने उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा क्रमांक ४५०/२०२६ नोंदवून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, गोपनीय माहितीचे संकलन तसेच विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. या समन्वित तपासामुळे पोलिसांनी अवघ्या १० तासांत अल्पवयीन मुलीचा शोध घेत तिची सुरक्षित सुटका केली.

यानंतर मुलीला सुखरूप तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पोवार करीत आहेत.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप गाडे यांच्या नेतृत्वात उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande