लोकमंगल फाउंडेशनकडून दक्षिण-उत्तर सोलापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)। आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणि
grdf


सोलापूर, 02 जुलै (हिं.स.)।

आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत बोरुळ, सावतखेड, बंकलगी, निम्बर्गी, नंदूर, हिरज आणि डोणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची उपलब्धता करून देत शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रत्येक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता व्यक्त केली.

यावेळी लोकमंगल फाउंडेशनचे संचालक उत्तम शिंदे आणि तिपण्णा पुजारी यांनी लोकमंगल परिवारामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांची माहिती दिली. अन्नपूर्णा योजना, लोटस योजना, विश्वमंगल उपक्रम, सोलापूर सोशल फाउंडेशन तसेच शिक्षण, सामाजिक विकास आणि जनहितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा त्यांनी आढावा घेतला.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकमंगल परिवार सातत्याने शैक्षणिक, सामाजिक आणि जनकल्याणकारी उपक्रम राबवत असून, भविष्यातही अशा उपक्रमांची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande