शाहरुख खानचा परदेशात स्वतःचे क्रिकेट स्टेडियम बांधून नवा विक्रम
नवी दिल्ली, 02 जुलै (हिं.स.) : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या आयपीएल फ्रँचायझी, कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) साठी एका महत्त्वपूर्ण टप्प्याची घोषणा केली. केकेआर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणारा पहिला जागतिक ब्रँड ठरला आहे, कारण लॉस एं
शाहरुख खान


नवी दिल्ली, 02 जुलै (हिं.स.) : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या आयपीएल फ्रँचायझी, कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) साठी एका महत्त्वपूर्ण टप्प्याची घोषणा केली. केकेआर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणारा पहिला जागतिक ब्रँड ठरला आहे, कारण लॉस एंजेलिसमधील नाईट रायडर्स क्रिकेट ग्राउंडवर अधिकृतपणे पहिला मेजर लीग सामना आयोजित करण्यात आला.

शाहरुख खानने आपले स्वप्न साकार झाल्याबद्दल सांगितले आणि विशेषतः आयसीसीचे अध्यक्ष जय शाह आणि आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजोग गुप्ता यांचे आभार मानले. पोमोना येथील फेअरफ्लेक्समध्ये असलेले हे स्टेडियम २०२८ च्या ऑलिम्पिकपूर्वी मेजर लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन करेल.

एका सोशल मीडिया पोस्टमध्ये, शाहरुख खानने जय शाह, आयसीसी आणि संजोग गुप्ता यांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. त्याने लॉस एंजेलिस आणि या प्रयत्नात सहभागी असलेल्या टीमला एक विशेष संदेशही पाठवला.

त्याने सांगितले की, हे मैदान केवळ एक क्रीडा सुविधा नाही, तर मनोरंजन, कुटुंबे आणि अविस्मरणीय क्षणांसाठीचे एक ठिकाण आहे. यातून त्याने केवळ एक क्रिकेट स्टेडियम म्हणून नव्हे, तर संस्कृती आणि समाजाचे केंद्र म्हणून ते विकसित करण्याची आपली इच्छा व्यक्त केली.

शाहरुख खानने या यशाचे वर्णन 'एकट्याचा विजय नसून एक सामूहिक प्रयत्न' असे केले. पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे, या प्रवासात अविश्वसनीय मदत करणाऱ्या जयभाईंचे विशेष आभार. त्यांनी या उपक्रमाला पूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल आयसीसी आणि त्याचे सीईओ, संजोग गुप्ता यांचेही आभार मानले.

शाहरुख खानने सोशल मीडियावर लिहिले, जे स्वप्न म्हणून सुरू झाले होते, ते आज सत्यात उतरले आहे. लॉस एंजेलिसमधील नाइट रायडर्स क्रिकेट मैदानावर सर्वांचे स्वागत आहे.त्याने असेही म्हटले की, हे स्टेडियम केवळ लॉस एंजेलिससाठी नाही, तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी आणि संपूर्ण नाइट रायडर्स परिवारासाठी आहे. त्याने आपला प्रसिद्ध संदेश, जांभळ्या आणि सोनेरी रंगावर विश्वास ठेवा, (Believe in Purple and Gold) ने चाहत्यांचे स्वागत केले आणि त्यांना लॉस एंजेलिस नाइट रायडर्सच्या या नवीन घराचा भाग बनण्याचे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande