
छत्रपती संभाजीनगर, 02 जुलै (हिं.स.)।
मुसळधार पावसामुळे शहरातील एका औद्योगिक परिसरालगतच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पाण्यातून पादचारी, वाहनधारक, शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरून संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने पाण्याचा निचरा करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली असून दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis