नाशिक येथे ४ आणि ५ जुलै रोजी एम.बी.ए. लीग ब्रीज स्पर्धेचे आयोजन
नाशिक, 02 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन, नाशिक जिल्हा ब्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे दिनांक चार आणि पाच जुलै २०२६ दरम्यान एम.बी.ए. लीग ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा नाशिकच्या गोखले शिक्षण संस्थ
नाशिक येथे ४ आणि ५ जुलै रोजी एम.बी.ए. लीग ब्रीज स्पर्धेचे आयोजन


नाशिक, 02 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन, नाशिक जिल्हा ब्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे दिनांक चार आणि पाच जुलै २०२६ दरम्यान एम.बी.ए. लीग ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा नाशिकच्या गोखले शिक्षण संस्थेच्या बी. बाय. के. कॉलेज परिसरातील गुरुदक्षिणा ऑडीटोरिअम हॉलमध्ये आयोजित करण्यात आल्या आहेत.

यामध्ये आहेत ''टीम ऑफ फोर म्हणजे स्विस लीग आणि मॅच पॉइंट पेअर्स असे दोन प्रकार असणार आहेत.

यामध्ये १८ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे उदघाटन दिनांक ४ जुलै रोजी सकाळी १०.०० वाजता महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे अध्यक्ष देवें दोषी आणि विनोद कपूर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर स्पर्धांना सुरवात होईल.

शनिवार दिनांक ०४ जून रोजी टीम ऑफ फोर म्हणजेच स्विस लीग स्पर्धा खेळविल्या जातील. दुसऱ्या दिवशी दिनांक पाच जुलै रोजी सकाळी स्विस लीग स्पर्धेतून पुढील टप्प्यासाठी पात्र झालेल्या चार संघामध्ये सुपर लीगच्या स्पर्धा होतील. यामध्ये सकाळी १४ बोर्डचे दोन राऊंड आणि दुपारी १४ बोर्डचा एक राऊंड खेळविले जातील. याचबरोबर मॅच पॉइंट पेअर्स या प्रकारामध्ये पेअर्स (जोडी) च्या स्पर्धा होतील. यामध्ये सकाळच्या सत्रात २४ बोर्ड तर दुपारच्या सत्रात २४ बोर्ड खेळविले जातील.

या स्पर्धेमध्ये जागतिक स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर पदके प्राप्त केलेले खेळाडूं अनिल पाध्ये , राजू तोलानी, कौस्तुभ बेंद्रे आणि इतर दर्जेदार खेळाडूंचा समावेश असणार आहे. राजू तोलानी आणि अनिल पाध्ये यांचा समावेश असलेल्या भारताच्या संघाने नुकत्याच गोवा येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशीप मध्ये भारताला रजत पदक मिळवून दिले होते अशी माहिती या स्पर्धेचे आयोजन प्रामुख हेमंत पांडे आणि दिली.

या स्पर्धाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे सचिव हेमंत पांडे, मित्र विहार क्लबचे अध्यक्ष तथा ब्रीज खेळाचे संघटक विनोद कपूर, जिल्हा ब्रीज असोसिएशनचे सचिव डॉ. अतुल दशपुते, सूर्या रेड्डी नियोजन करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande