छ. संभाजीनगर : मनपाच्या कारवाईवर एमआयएमचा हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर, 02 जुलै (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईवरून शहरात नवा वाद पेटला आहे. मुस्लीम नुमाइंदा कौन्सिलच्या चार पदाधिकाऱ्यांना त्यांच्या नावावर कोणतीही मालमत्ता नसतानाही नोटिसा बजावण्यात आल्याचा आरोप करण्य
छ. संभाजीनगर : मनपाच्या कारवाईवर एमआयएमचा हल्लाबोल


छत्रपती संभाजीनगर, 02 जुलै (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईवरून शहरात नवा वाद पेटला आहे. मुस्लीम नुमाइंदा कौन्सिलच्या चार पदाधिकाऱ्यांना त्यांच्या नावावर कोणतीही मालमत्ता नसतानाही नोटिसा बजावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कारवाईविरोधात एमआयएम आणि कौन्सिलच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. नोटिसा तातडीने मागे घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. ही कारवाई कोणाच्या दबावाखाली करण्यात आली? असा सवाल उपस्थित करत एमआयएमने प्रशासनाला थेट इशारा दिला असून, न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande