
बीड, 02 जुलै (हिं.स.)। गेवराई मतदारसंघातील शेत रस्त्यांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आली असल्याची माहिती आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली.
गेवराई विधानसभा मतदारसंघातील शेतकरी बांधवांना शेतात ये-जा करण्यासाठी आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी पक्के रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजने' अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या निधीतून मतदारसंघातील विविध पाणंद आणि शेत रस्त्यांची कामे मार्गी लागतील. यामुळे पावसाळ्यात होणारी चिखलाची गैरसोय कायमची दूर होईल आणि शेतकऱ्यांचा वेळ व श्रम वाचतील.
मतदारसंघातील या महत्त्वाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महायुती सरकारचे आभार.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis