नांदेड - डाएटचे प्राचार्य अमोल निळेकर यांनी शाळा भेटीदरम्यान घेतला मूल्यवर्धन कार्यक्रमाचा आढावा
नांदेड, 02 जुलै, (हिं.स.)। डाएटचे प्राचार्य अमोल निळेकर यांनी जि.प. प्रा. शाळा, तुप्पा आणि जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, जवाहरनगर या दोन शाळांना भेट दिली. शाळा भेटीदरम्यान त्यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला. वर्गांमध्ये शांतता सं
Q


नांदेड, 02 जुलै, (हिं.स.)। डाएटचे प्राचार्य अमोल निळेकर यांनी जि.प. प्रा. शाळा, तुप्पा आणि जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, जवाहरनगर या दोन शाळांना भेट दिली. शाळा भेटीदरम्यान त्यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाचा सविस्तर आढावा घेतला.

वर्गांमध्ये शांतता संकेत, वर्गनियम आदींची अंमलबजावणी करण्यात आली आहे का, याची पाहणी केली. तसेच मूल्यवर्धन उपक्रमांसाठी आठवड्यातून दोन तासिकांचे नियोजन करणे, शालेय वेळापत्रकात मूल्यवर्धनचा समावेश करणे याबाबत शिक्षकांशी संवाद साधला. याशिवाय, सहयोगी अध्ययन पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची जडणघडण प्रभावीपणे कशी करता येईल, याबाबतही शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची तयारी दर्शविली.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande