नशा मुक्त भारत अभियानात सहभागी व्हा-आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे
पुणे, 02 जुलै (हिं.स.)। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समतेच्या विचारांची जोपासना करण्यासोबतच नशा मुक्त भारत अभियानाअंतर्गत राज्यामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, आपल्या परिवारासह मित्रांनाही या
evm


पुणे, 02 जुलै (हिं.स.)।

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समतेच्या विचारांची जोपासना करण्यासोबतच नशा मुक्त भारत अभियानाअंतर्गत राज्यामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, आपल्या परिवारासह मित्रांनाही या अभियानात जोडण्याचे काम करावे, अभियान यशस्वी करण्याकरिता सर्व घटकांने पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याच्या समाज कल्याण आयुक्य दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले.

सहायक आयुक्त, समाज कल्याण आणि श्री. शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती, यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय दिन नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी समता दिंडी तसेच नशा मुक्त भारत अभियान अंतर्गत प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. समता दिंडीची सुरूवात राजीव गांधी ॲकडमी ऑफ ई-लर्निंग स्कुल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, अनुराग सोसायटी, शिवदर्शन पूरग्रस्त वसाहत, पर्वती पायथा, पुणे येथून करून अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे श्री शाहू मंदीर महाविद्यालय, पर्वती पायथा, पुणे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करुन समता दिंडीचा समारोप करण्यात आला.

यावेळी श्रीमती मुंडे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज गुणवंत पुरस्कार प्राप्त विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सन्मान करण्यात आला. समता दिंडीमध्ये समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद, समाज कल्याण विभागातील गृहप्रमुख, शासकीय वसतिगृहातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.

यावेळी सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॅा.राधाकिसन देवढे, श्रीमती. सहायक आयुक्त मिना आंबाडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी प्रमोद फडणीस, आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. लोंढे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचक केले. तसेच नशामुक्ती मित्र नोंदणी मोहिमेकरिता असलेल्या https://nmba.dosje.gov.in/volunteer/registration या लिंकवर अधिकाधिक नागरिक व विद्यार्थींनी नोंदणी करण्याचे आवाहन केले. तसेच श्री. देवढे यांच्यासमेवत उपस्थितांनी सामुहिकरित्या नशा मुक्तीबाबतची शपथ घेतली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande