
छत्रपती संभाजीनगर, 02 जुलै (हिं.स.) पैठण शहरातील एका किराणा व्यापारी नाथसागर धरणात बुडाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी घडली. घटनेनंतर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलासह पैठण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली आहे.
पैठण येथील रामनगर परिसरात राहणारे प्रभू किराणा दुकानाचे व्यापारी देवेंद्र कमलनारायण खंडेलवाल (वय ४५) हे सकाळी नाथसागर धरण परिसरात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक आणि जोरदार वाऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला होता. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांनी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले. प्रभू किराणा मालाचे व्यापारी देवेंद्र कमलनारायण खंडेलवाल नाथसागर धरणावर पोहण्यासाठी जाताना सीसीटीव्ही मध्ये दिसलेले छायाचित्र प्राप्त झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis