लातूर - नवनियुक्त मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी यांचे भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत
लातूर, 02 जुलै (हिं.स.)। लातूर मनपाचे विरोधी पक्षनेते देवीदास काळे देविदास काळे यांनी लातूर महानगरपालिकेच्या नूतन आयुक्तपदी अधिकृत पदभार स्वीकारल्याबद्दल राहुल कुलकर्णी (IAS) यांचे अभिनंदन आणि हार्दिक स्वागत केले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने लात
मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी


लातूर, 02 जुलै (हिं.स.)।

लातूर मनपाचे विरोधी पक्षनेते देवीदास काळे देविदास काळे यांनी लातूर महानगरपालिकेच्या नूतन आयुक्तपदी अधिकृत पदभार स्वीकारल्याबद्दल राहुल कुलकर्णी (IAS) यांचे अभिनंदन आणि हार्दिक स्वागत केले.

भारतीय जनता पार्टीच्या वतीने लातूर मनपाचे विरोधी पक्षनेते देवीदास काळे यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, नगरसेविका यांनी नूतन आयुक्त राहुल कुलकर्णी यांची सदिच्छा भेट घेऊन लातूर शहराच्या सद्यस्थितीबद्दल सविस्तर चर्चा केली. तसेच त्यांना लातूर शहराची भौगोलिक रचना, वाढती लोकसंख्या आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन रस्ते, अमृत पाणीपुरवठा योजना, कचरा व्यवस्थापन, शहरातील स्वच्छता मोहीम आणि प्रलंबित विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande