पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मातृत्व संजीवनी अभियान’चा शुभारंभ
पुणे, 02 जुलै (हिं.स.)। राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरात रीबॉर्न वूमन केअर क्लिनिक अँड इंटिग्रेटेड फर्टिलिटी सेंटर या अत्याधुनिक, आयुर्वेद-आधारित महिला आरोग्य व वंध्यत्व उपचार केंद्राचे भव्य उद्घाटन आज मोठ्या उत्साहात संपन
gfd


पुणे, 02 जुलै (हिं.स.)। राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरात रीबॉर्न वूमन केअर क्लिनिक अँड इंटिग्रेटेड फर्टिलिटी सेंटर या अत्याधुनिक, आयुर्वेद-आधारित महिला आरोग्य व वंध्यत्व उपचार केंद्राचे भव्य उद्घाटन आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले.या क्लिनिकचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवीभाऊ लांडगे यांच्या हस्ते पार पडले.

या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नगरसेवक राहुल कलाटे, भाजप उपाध्यक्ष राम वाकडकर, नगरसेविका आरती चोंधे, नगरसेविका श्रुती वाकडकर, नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे तसेच नगरसेवक राहुल जाधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक डॉक्टरांचा “डॉक्टर्स गौरव सोहळा” आयोजित करण्यात आला. वैद्यकीय सेवेत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande