पुणेकरांना दिलासा! खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा वाढला
पुणे, 02 जुलै (हिं.स.)। गेल्या दोन आठवड्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याचा सामना करणाऱ्या पुणेकरांसाठी मान्सूनने दिलासादायक बातमी आणली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली असून, सध्या सुमारे पाच ते सह
Dam


पुणे, 02 जुलै (हिं.स.)।

गेल्या दोन आठवड्यांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याचा सामना करणाऱ्या पुणेकरांसाठी मान्सूनने दिलासादायक बातमी आणली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली असून, सध्या सुमारे पाच ते सहा दिवसांचा अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज असल्याने धरणांतील पाणीसाठ्यात आणखी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.

घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोसे खोऱ्यातून पानशेत आणि वरसगाव धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीतील साठ्यात सातत्याने वाढ होत आहे.

सध्या पुणे महानगरपालिका शहरासाठी दररोज सुमारे ०.०३ टीएमसी पाण्याचा उपसा करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठा स्थिर राहिला असून, आगामी काळात पावसाचा जोर कायम राहिल्यास शहराच्या पाणीस्थितीत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande