परळी येथे छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा स्थापित
बीड, 02 जुलै (हिं.स.)। हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळील चौकात नगर परिषद, परळीच्या वतीने आकर्षक व आधुनिक फाउंटन प्रस्थापित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी स्मृतीला साजेशी ही सौंदर्यवृ
परळी येथे छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा स्थापित


बीड, 02 जुलै (हिं.स.)। हिंदवी स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळील चौकात नगर परिषद, परळीच्या वतीने आकर्षक व आधुनिक फाउंटन प्रस्थापित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी स्मृतीला साजेशी ही सौंदर्यवृद्धी चौकाचे सौंदर्य अधिक खुलवणारी असून नागरिकांसाठी आणि शहरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.परळी शहर अधिक सुंदर, सुशोभित आणि आधुनिक करण्याच्या दिशेने नगर परिषद सातत्याने कार्यरत असून अशी विकासकामे पुढेही सुरू राहतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande