वटपौर्णिमा स्पर्धेत छायाचित्रकारांच्या सर्जनशीलतेला दाद
रायगड, 02 जुलै (हिं.स.)। : रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनशी संलग्न अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने वटपौर्णिमा या पारंपरिक सणाचे महत्त्व छायाचित्रण आणि रीलच्या माध्यमातून जपण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ‘वटपौर्णिमा’ फोटोग्राफी व र
Photographers' creativity appreciated in Vat Purnima competition


रायगड, 02 जुलै (हिं.स.)। : रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनशी संलग्न अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने वटपौर्णिमा या पारंपरिक सणाचे महत्त्व छायाचित्रण आणि रीलच्या माध्यमातून जपण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ‘वटपौर्णिमा’ फोटोग्राफी व रील मेकिंग स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला तालुक्यातील छायाचित्रकार आणि रील निर्मात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गोकुळेश्वर तलाव परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत १४ फोटोग्राफर आणि ८ रील निर्मात्यांनी सहभाग घेतला. मेकअप आर्टिस्ट मृणाली कांबळे आणि ड्रेस डिझायनर प्रीतेश भगत यांनी साकारलेल्या सृष्टी पाटील व अर्पिता कवजी या मॉडेल्सवर आधारित छायाचित्रे आणि रील्स तयार करण्यात आल्या. स्पर्धकांनी सादर केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन हॉटेल गुरुप्रसादच्या सभागृहात भरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण रायगडमधील नामवंत फोटोग्राफर संदीप वाटवे आणि नितीन पाटील यांनी केले.

फोटोग्राफी स्पर्धेत अक्षय हिवाळे यांनी प्रथम, निशांत मढवी यांनी द्वितीय, तर विराज घरत यांनी तृतीय क्रमांक पटकावला. रील मेकिंग स्पर्धेत निशांत मढवी प्रथम, कल्याण पाटील द्वितीय आणि मयुरेश पाटील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.

विजेत्यांना तरुण उद्योजक संदीप गायकवाड, रायगड फोटोग्राफर अँड व्हिडिओग्राफर असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे, अध्यक्ष तुषार थळे व अन्य मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अमर मढवी आणि निलेश दुदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande