
मुंबई, 02 जुलै (हिं.स.) - श्रीराम ग्रुपची प्रमुख कंपनी असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेडने (SFL) आपल्या विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील (FDs) व्याजदरात सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. हे सुधारित व्याजदर २ जुलै २०२६ पासून लागू होणार आहेत. ठेवींच्या दरातील ही वाढ पाहता, पुढील काळात कर्जाचे व्याजदर घटण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून येत आहे.
या मुदत ठेवींना क्रिसिल रेटिंग्सतर्फे CRISIL AAA/Stable, इक्राकडून [ICRA]AAA (Stable), इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चतर्फे IND AAA/Stable आणि केअर रेटिंग्सकडून CARE AAA/Stable अशी सर्वोच्च श्रेणी मिळाली आहे.
सुधारित व्याजदर (रु. १० कोटींपर्यंतच्या ठेवींसाठी):
२ जुलै २०२६ पासून लागू होणारे सुधारित वार्षिक व्याजदर खालीलप्रमाणे
- १२ महिने : जुना दर ६.७५% | सुधारित दर ६.८५%
- १५ महिने (केवळ
डिजिटल) : जुना दर ७.०५% | सुधारित दर
७.१०%
- १८ महिने ते २३
महिने : जुना दर ७.००% | सुधारित दर
७.०५%
- २४ महिने ते ३५
महिने : जुना दर ७.०५% | सुधारित दर
७.१०%
- ३६ महिने ते ६०
महिने : जुना दर ७.२५% | सुधारित दर
७.५०%
अतिरिक्त फायदे
• जेष्ठ नागरिक: ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना ठेव किंवा नूतनीकरणाच्या वेळी प्रतिवर्ष ०.५०% अतिरिक्त व्याज मिळेल.
• महिला ठेवीदार: महिला ठेवीदारांना प्रतिवर्ष ०.०५% अतिरिक्त व्याज दिले जाईल.
• नूतनीकरण: मुदत संपलेल्या ठेवींच्या नूतनीकरणावर प्रतिवर्ष ०.१५% अतिरिक्त व्याज मिळेल.
• ठेवीची मर्यादा: ठेवी किमान रु. ५,०००/- आणि त्यानंतर रु. १,०००/- च्या पटीत स्वीकारल्या जातील.
फिक्स इन्व्हेस्टमेंट प्लॅन (FIP) - सुधारित दर:
या योजनेचे सुधारित वार्षिक दर २ जुलै २०२६ पासून पुढीलप्रमाणे :
- १२ ते २३
महिने : जुना दर ६.७५% | सुधारित दर
६.८५%
- २४ ते ३५
महिने : जुना दर ७.०५% | सुधारित दर
७.१०%
- ३६ ते ४८
महिने : जुना दर ७.२५% | सुधारित दर
७.५०%
FIP चे अतिरिक्त नियम व अटी
- महिला
ठेवीदारांना प्रतिवर्ष ०.०५% अतिरिक्त व्याज मिळेल.
- फिक्स
इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या (FIP) इतर सर्व अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल
झालेला नाही.
- FIP चा हप्ता किमान
रु. १,०००/- आणि त्यानंतर रु.५००/- च्या
पटीत स्वीकारला जाईल.
-
श्रीराम
फायनान्स लिमिटेडबद्दल
श्रीराम
फायनान्स लिमिटेड ही श्रीराम ग्रुपची मुख्य कंपनी असून कन्झ्युमर फायनान्स,
लाईफ इन्शुरन्स,
जनरल इन्शुरन्स,
स्टॉक ब्रोकिंग आणि
डिस्ट्रिब्युशन व्यवसायात तिचा मोठा वाटा आहे. रु.३.०२ ट्रिलियनपेक्षा
जास्त व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) असलेली ही भारतातील सर्वात मोठ्या रिटेल अॅसेट
फायनान्सिंग नॉन-बैंकिंग फायनान्स कंपन्यांपैकी (NBFC) एक आहे.
१९७९
मध्ये स्थापन झालेली ही कंपनी छोटे रस्ते वाहतूकदार आणि छोट्या व्यावसायिकांच्या
गरजा पूर्ण करते. तसेच
जुन्या व्यावसायिक वाहनांच्या आणि दुचाकींच्या संघटित वितरणात ती आघाडीवर आहे.
कंपनीच्या विविध
उत्पादनांमध्ये पॅसेंजर कमर्शियल वेहिकल्स, एमएसएमई (MSMEs) कर्जे, ट्रॅक्टर्स आणि शेतीची उपकरणे, सुवर्ण कर्ज,
वैयक्तिक कर्ज आणि
वर्किंग कॅपिटल कर्ज इत्यादींचा समावेश आहे.
गेल्या
४७ वर्षांत कंपनीने कर्ज मंजुरी, जुन्या वाहनांचे व इतर मालमत्तेचे मूल्यांकन आणि
कर्ज वसुली क्षेत्रात मजबूत कौशल्य विकसित केले आहे. श्रीराम फायनान्सचे देशभरात ३,२२५ शाखांचे जाळे
पसरलेले असून, ७६,२४१ कर्मचारी आणि
९७.३३ लाख ग्राहक आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी