अमरावतीच्या शेतकऱ्याचा 'पंचामृत' प्रयोग राष्ट्रीय पातळीवर गाजला
- शेतीत कमी खर्चात अधिक उत्पादनाचा दावा अमरावती, 02 जुलै (हिं.स.) : रासायनिक खतांचा वाढता वापर, उत्पादन खर्चातील वाढ आणि वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त शेतकऱ्यांसाठी अमरावतीतील प्रयोगशील शेतकरी रवींद्र मेटकर यांनी विकसित केलेला “पंचामृत” प
रासायनिक खतांना फाटा! अमरावतीच्या शेतकऱ्याचा 'पंचामृत' प्रयोग राष्ट्रीय पातळीवर गाजला


- शेतीत कमी खर्चात अधिक उत्पादनाचा दावा

अमरावती, 02 जुलै (हिं.स.) : रासायनिक खतांचा वाढता वापर, उत्पादन खर्चातील वाढ आणि वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त शेतकऱ्यांसाठी अमरावतीतील प्रयोगशील शेतकरी रवींद्र मेटकर यांनी विकसित केलेला “पंचामृत” प्रयोग नवा पर्याय म्हणून पुढे येत आहे. अंडी, ताक, गूळ, चुना आणि तुरटी या सहज उपलब्ध घटकांपासून तयार होणारे हे द्रावण पिकांच्या वाढीस, उत्पादनक्षमतेस आणि रोगप्रतिकारक शक्तीस चालना देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मेटकर यांनी अंजनगाव बारी येथील आपल्या शेतात अनेक वर्षांच्या अनुभवातून हा प्रयोग विकसित केला असून पारंपरिक शेतीला आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देत हे जैविक द्रावण तयार करण्यात आले आहे.या पंचामृतामध्ये अंडी, ताक, गूळ, चुना आणि तुरटी यांचा समावेश आहे. अंड्यांतील अमिनो आम्ले आणि प्रथिने पिकांच्या वाढीस मदत करतात, तर ताकातील सूक्ष्मजीव बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यास सहाय्य करतात. तुरटी जंतुनाशक म्हणून काम करते, चुना कॅल्शियम पुरवतो आणि गूळ सूक्ष्मजीवांच्या वाढीस पोषक ठरतो. दीड लिटर ताकात 12 अंडी, प्रत्येकी 100 ग्रॅम गूळ, तुरटी आणि चुना मिसळून हे मिश्रण 15 ते 20 दिवस ठेवले जाते. एका एकरासाठी या द्रावणाचा खर्च सुमारे 100 रुपये इतका येतो, असे रवींद्र मेटकर यांनी सांगितले.

उत्पादनात वाढ झाल्याचा दावा

मेटकर यांच्या म्हणण्यानुसार, सोयाबीन पिकावर चार वेळा पंचामृत फवारणी केल्यानंतर उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. तूर, कांदा आणि ज्वारी या पिकांमध्येही सकारात्मक परिणाम दिसून आले असून काही शेतकऱ्यांना ज्वारीत एकरी 25 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे.पिकांची वाढ, दाण्यांचा भराव आणि गुणवत्तेमध्ये सुधारणा झाल्याचे निरीक्षण शेतकऱ्यांनी नोंदवले आहे.या द्रावणाचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण फायदा म्हणजे त्याचा विशिष्ट गंध. या गंधामुळे रानडुक्कर, रोही, माकडे आणि काही पक्षी शेतात येण्याचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यास मदत होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रीय स्तरावर दखलडिसेंबर 2025 मध्ये किसान दिनानिमित्त दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमात या जैविक द्रावणाचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रीय नवप्रवर्तन फाउंडेशनच्या तज्ज्ञांनी त्याची तपासणी करून नमुने वैज्ञानिक पडताळणीसाठी घेतले.अहमदाबाद–गांधीनगर येथील संशोधन केंद्रात झालेल्या तपासणीत हे द्रावण पिकांच्या वाढीस उपयुक्त असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर राष्ट्रीय नवप्रवर्तन फाउंडेशनने या नवकल्पनेची नोंदणी करून तिला राष्ट्रीय स्तरावर मान्यता दिल्याची माहिती मेटकर यांनी दिली.-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande