नांदेड - एसआयआर कार्यक्रमांतर्गत सिडको भागात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार वारकड यांनी दिल्या भेटी
नांदेड, 02 जुलै (हिं.स.)। मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम एसआयआर अंतर्गत नांदेडचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी सिडको भागातील रामनगर येथी
नांदेड - एसआयआर कार्यक्रमांतर्गत सिडको भागात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार वारकड यांनी दिल्या भेटी


नांदेड, 02 जुलै (हिं.स.)। मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम एसआयआर अंतर्गत नांदेडचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी सिडको भागातील रामनगर येथील विविध ठिकाणी भेटी देऊन नाव नोंदविण्यासाठी आवश्यक फॉर्म वाटपाचा शुभारंभ केला व या कामाचा आढावा घेतला. यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी सूरज स्वामी यांचे सह नियुक्त कर्मचारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मा. भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचे विशेष पुनरिक्षण कार्यक्रम एस आय आर राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने 87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ अंतर्गत बीएलओ यांच्याकडून मतदारांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आवश्यक फार्मचे वाटप करून व त्यांची माहिती भरून घेण्याचे काम 30 जून 2026 पासून सुरू झाले आहे. त्या अनुषंगाने कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी सिडको भागातील रामनगर परिसरातील यादी भाग क्रमांक २०८ मधील मतदारांना भेटी दिल्या व कामासंबंधी समाधान व्यक्त केले.

यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी सुरज स्वामी, बीएलओ पर्यवेक्षक कालिदास जाधव, एस एम देवरे, संतोष जाधव, दिलीप कोणापुरे, गोविंद क्षीरसागर आदी उपस्थित होते. यावेळी अश्विनी अनिल पद्मावार, अनिल रामदास पद्मावार, हनुमंत शंकरराव भोसकर , गिरीश हनुमंतराव भोसकर यांना मान्यवराच्या उपस्थितीत एस आय आर संबंधी इम्युनरेशन फॉर्म वाटप करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande