छ. संभाजीनगर : निकृष्ट पोषण आहारावर जिल्हा परिषदेत गदारोळ
छत्रपती संभाजीनगर, 02 जुलै (हिं.स.)। निकृष्ट पोषण आहारावर जिल्हा परिषदेत गदारोळ झाला ,सदस्यांनी सभागृहात पाकिटे भिरकावली गेली . अंगणवाड्यांतील चिमुकल्यांना व स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभे
छ. संभाजीनगर : निकृष्ट पोषण आहारावर जिल्हा परिषदेत गदारोळ


छत्रपती संभाजीनगर, 02 जुलै (हिं.स.)।

निकृष्ट पोषण आहारावर जिल्हा परिषदेत गदारोळ झाला ,सदस्यांनी सभागृहात पाकिटे भिरकावली गेली .

अंगणवाड्यांतील चिमुकल्यांना व स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार गदारोळ झाला. उद्धवसेनेचे सदस्य संजय निकम यांनी पोषण आहाराची पाकिटे सभागृहात दाखवत हा आहार अधिकाऱ्यांनी खाऊन दाखवावा, अन्यथा संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. आहार निकृष्ट असल्याचा आरोप करत त्यांनी पाकिटे भिरकावली. काही सदस्यांनीही त्यांना पाठिंबा दिला. यावर अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी पोषण आहाराचा दर्जा तपासून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande